जबलपूर (मध्यप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन साजरा करतांना धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

  • पोलिसांवर दगडफेक

  • पोलिसांकडून लाठीमार, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

  • मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? – संपादक
  • पोलिसांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष का बोलत नाहीत कि पोलिसांवर आक्रमण करणे हा धर्मांधांचा ‘धर्मसिद्ध अधिकार आहे’, असे त्यांना वाटते ? – संपादक
पोलिसांवर दगडफेक करताना धर्मांध

जबलपूर (मध्यप्रदेश) – महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मिलाद-उन-नबी’ सण साजरा करण्यासाठी येथील संवेदनशील समजल्या जाणार्‍या मच्छी बाजारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना निर्धारित मार्गाने जाण्यासाठी पोलीस विनंती करत होते; मात्र अचानक पोलिसांवर दगडफेक चालू करण्यात आली. तसेच पेटते फटाकेही फेकण्यात आले. यामुळे पोलिसांनी उपस्थित धर्मांधांवर लाठीमार केला आणि नंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना पांगवले, अशी माहिती जबलपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली.

जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर पेटते फटाके आणि दगड फेकणार्‍या लोकांची ओळख पटवण्यात यश आले आहे. अशांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.