रोम (इटली) येथील चर्चचे ८६ लाख रुपये चोरून ‘समलैंगिक संबंधांची मेजवानी’ आयोजित करणारा पाद्री अटकेत !

मेजवानीमध्ये अमली पदार्थांचाही वापर

अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात; कारण त्यांच्या लेखी पाद्य्रांची प्रतिमा अशी नाही आणि ते भारतियांना तशी करून देऊ इच्छित नाहीत ! – संपादक

पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी

रोम (इटली) – येथील ४० वर्षीय पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी याला चर्चचे ८६ लाख रुपये चोरल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या चोरलेल्या पैशांतून या पाद्य्राने स्वतःच्या घरी समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांची ‘लैंगिक संबंधांची मेजवानी’ (सेक्स पार्टी) आयोजित केली होती. तसेच या मेजवानीसाठी त्याने अमली पदार्थही विकत घेतले होते. ‘डेली मेल’ या इंग्लंडच्या दैनिकाने हे वृत्त प्रकाशित केले आहे. हा पाद्री येथील प्रेटो चर्चमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

अमली पदार्थांच्या संदर्भात पोलिसांकडून चौकशी चालू असतांना पोलिसांना या पाद्य्राची माहिती मिळाली आणि त्यातून हा प्रकार उघडकीस आला. पाद्य्रासमवेत रहाणारा त्याचा सहकारी अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये सहभागी होता. त्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. या सहकार्‍याने नेदरलँडमधून ‘जीएच्बी’ नावाचे अमली पदार्थ मागवले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हे अमली पदार्थ या सहकार्‍यापर्यंत आणि नंतर पाद्य्रापर्यंत पोचले. पोलिसांना पाद्य्राच्या घरामध्येही जीएच्बी अमली पदार्थ सापडले.