(म्हणे) ‘ तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते ! –  समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

  • बर्क यांच्यासारख्या लोकांना ‘स्वतंत्र’ झालेल्या अफगाणिस्तानमध्ये पाठवण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! — संपादक
  • भारतातील एकाही इस्लामी संघटनेने किंवा इस्लामी नेत्याने तालिबानचा विरोध केला नाही, हे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाव यांची टिमकी वाजवणारे लक्षात घेतील का ? कि त्यांचेही तालिबानला समर्थन आहे ? – संपादक
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि रशिया यांना जम बसू दिला नाही. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते. अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य तेथील लोकांची वैयक्तिक गोष्ट आहे, असे सांगत समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी तालिबानने अफगाणिस्तानवर मिळवलेल्या नियंत्रणाचे समर्थन केले. ‘तालिबानपासून भारताला धोका नाही; कारण भारत एक सशक्त देश आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. बर्क यांनी अफगाणिस्तानमधील तालिबानच्या लढ्याची तुलना भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी केली.