|
|
श्रीनगर – आतंकवादी संघटनांसाठी काम करणार्या काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुदीन याच्या दोन मुलांचा समावेश आहे. बडतर्फ करण्यात आलेले हे कर्मचारी जम्मू-काश्मीर पोलीस, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा आणि आरोग्य या खात्यांतील कर्मचारी आहेत. घटनेच्या अनुच्छेद ३११ नुसार त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईच्या विरोधात त्यांच्याकडे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.
J&K: 11 govt employees, including sons of terror org Hizbul Mujahideen chief Syed Salahuddin fired in terror funding case https://t.co/1LsTDBNly2
— OpIndia.com (@OpIndia_com) July 11, 2021
१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या अन्वेषणात सलाहुद्दीन याची दोन मुले सय्यद अहमद शकील आणि शाहीद युसुफ हे आतंकवादाला आर्थिक साहाय्य करत असल्याचे सिद्ध झाले. पैशांची व्यवस्था करणे, पैसे स्वीकारणे आणि हवालाच्या माध्यमातून ते पैसे हिजबुल मुजाहिदीनकडे आतंकवादी कारवायांसाठी हस्तांतरित करणे, यामध्ये या दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, असे अधिकार्यांनी सांगितले.
२. या ११ कर्मचार्यांपैकी कुपवाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करणारा १ कर्मचारी हा लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेत असल्याचेही आढळून आले. आतंकवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती देणे, तसेच आतंकवाद्यांना आश्रय देणे, ही कामे तो करत होता.
३. यासह अनंतनाग जिल्ह्यातील २ शिक्षक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचेही आढळून आले.