मंदिरातील मूर्ती आणि रथ भस्मसात !
‘बांगलादेशमध्ये आमचे राज्य आहे’, असेच यातून बांगलादेशातील धर्मांध हे भारताला आणि हिंदूंना दाखवून देत आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
(सौजन्य : इंडिया टुडे)
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम अज्ञातांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या. महंमदपूर उपजिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि हिंदू-बौद्ध क्रिश्चियन ओइक्या परिषदेच्या आयोजन समितीच्या माजी सचिव स्वप्नरानी बिस्वास यांनी या घटनेची माहिती दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौर्यानंतर जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मणबरिया येथे हिंदू मंदिरातील कालीमाता आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तींची तोडफोड केली होती.