मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवास्थानाच्या बाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण
हे प्रकरण अधिकाधिक संवेदनशील होत असल्याने हा संदेश तिहार कारागृहातून बंदीवानाने पाठवला कि अन्य कुणी आणि तो का पाठवला, याची माहिती समोर येणे आवश्यक !
नवी देहली – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील प्रसिद्ध अँटीलिया निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पियो गाडी आढळली होती. ही स्फोटके ठेवल्याचे दायित्व घेतल्याचा संदेश २६ फेब्रुवारीला टेलीग्रामवरून जैश-उल-हिंदने पाठवला होता; मात्र नंतर तो खोटा असल्याचे याच संघटनेने अधिकृतरित्या स्पष्ट केले होते. राष्ट्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीमध्ये टेलीग्रामवरून आलेला हा खोटा संदेश तिहार कारागृहातून आल्याचे समोर आले. यानंतर देहली पोलिसांना याची कल्पना देण्यात आल्यावर कारागृहात झडती घेण्यात आल्यावर ३ स्मार्ट फोन जप्त करण्यात आले. यातील एकातूनच हा संदेश पाठवण्यात आल्याचे उघड झाले. एन्.आय.ए.याचे पुढील अन्वेषण करत आहे.