देहली दंगलीतील संशयित हिंदु आरोपींची हत्या करण्याचा धर्मांध आरोपींचा कट उघड : दोघा धर्मांधांना अटक

  • अटक करून कारागृहात टाकल्यानंतरही धर्मांध त्यांची गुन्हेगारी वृत्ती जागृत ठेवून सूड घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
  • कारागृहात हत्या करण्याचा प्रयत्न केला जातो, याचा अर्थ कारागृहाची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ आहे, हे लक्षात येते. याला उत्तरदायी असणार्‍यांनाच या कारागृहात डांबले पाहिजे !

 

नवी देहली – देहली दंगलीच्या प्रकरणी येथील तिहार कारागृहात अटकेत असलेल्या संशयित हिंदु आरोपींची हत्या करण्याचा कट तेथेच अटकेत असलेल्या एका धर्मांधाने त्याच्या बाहेर असणार्‍या सहकार्‍यासह रचल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी या दोघांना अटक केली आहे. हिंदु आरोपींना कारागृहामध्ये पारा पाजून ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यात कारागृहात अटकेत असलेला शाहिद आणि कारागृहाबाहेर असलेला अस्लम या दोघांनी हा कट रचला होता. त्यासाठी अस्लमने कारागृहात शाहिदकडे पारा पोचवला होता.

अंकित आणि त्याचे २ सहकारी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. धर्मांध आरोपींना संशय होता की, या हिंदु आरोपींनी देहलीतील जाफराबाद येथे एका धार्मिक स्थळाला आग लावली होती; मात्र प्रत्यक्षात पोलिसांच्या चौकशीत अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले आहे. कारागृहात पारा कसा पोचवण्यात आला, याचीही आता पोलीस चौकशी करत आहेत.