अमली पदार्थांच्या विळख्यात भारतातील भावी पिढी !

प्रतिकात्मक छायाचित्र

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील १० ते १७ वयोगटांतील १ कोटी ४८ लाख मुले अल्कोहोल, अफीम, कोकेन, भांग यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. हे सर्वेक्षण वर्ष २०१८ च्या आकडेवारीवर आधारित आहेत. लोकसभेमध्ये सामाजिक न्यायमंत्री रतनलाल कटारिया यांनी याविषयी लेखी उत्तरात ही माहिती दिली. या सर्वेक्षणानुसार वर्ष १८ ते ७५ या वयोगटांमध्ये भांग सेवन करणार्‍यांची संख्या अंदाजे २ कोटी ९० लाख आहे, तर अफीम सेवन करणार्‍यांची संख्या १ कोटी ९० लाख इतकी आहे.