गणेश मार्केट येथील शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन 

गणेश मार्केट येथील शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांना अभिवादन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना जितेंद्र शहा

सांगली, २४ जानेवारी (वार्ता.) – गणेश मार्केट येथील शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी अनिल शेटे, जितेंद्र शहा, प्रसाद रिसवडे, अतुल माने, मानसी शहा, प्रियांका साळी, रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळकर यांसह अन्य उपस्थित होते.

शिवसेना वाढण्यामागे हिंदुत्व वाढावे हीच प्रामाणिक भूमिका ! – पू. भिडेगुरुजी 

पू. भिडेगुरुजी

या वेळी पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘सांगलीत शिवसेनेच्या २०० ते ३०० शाखा असणे आवश्यक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वावर काम करतांना वेगळा आदर्श घालून दिला आहे. बाबरी मशीद पाडली, तेव्हा ‘पाडणारे आमचे शिवसैनिक असतील, तर त्यांचा मला अभिमान आहे’, असे ठणकावून सांगणारे एकमेव बाळासाहेब ठाकरे होते. १ मे २०१६ ला शिवसेनापक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना सांगलीत शिवसेना जोरात वाढावी. या उद्देशाने मी सांगलीत बोलावले होते. शिवसेना वाढण्यामागे हिंदुत्व वाढावे. हीच प्रामाणिक भूमिका माझी त्या वेळी होती.’’

वेलणकर अनाथ बालकाश्रम येथे खाऊ वाटप ! 

वेलणकर अनाथ बालकाश्रम येथे खाऊ वाटप करतांना शिवसैनिक 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने वेलणकर अनाथ बालकाश्रम येथे फळे-बिस्किटे असे खाऊ वाटप करण्यात आले.