बजरंग दलाच्या वतीने तासगाव मारुति वेस येथे शनिवारी महाआरतीचे नियोजन !

बजरंग दलाच्या वतीने महाआरती (प्रतिकात्मक चित्र )

मिरज (जिल्हा सांगली) – हिंदू संघटन आणि त्या संघटनासाठी ईश्‍वरी पाठबळ यांसाठी बजरंग दलाच्या वतीने गेले काही मास कर्मवीर भाऊराव चौक येथील तासगाव मारुति वेस येथील हनुमान मंदिरात प्रत्येक शनिवारी रात्री ८.३० सामूहिक आरतीचे आयोजन केले जाते. २३ जानेवारी या दिवशी होणार्‍या महाआरतीच्या निमित्ताने सर्व श्रीराम भक्त आणि हिंदु बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव यांनी केले आहे.