केरळमध्ये आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी पीएफ्आयने पैसे गोळा केले ! – ईडीचा आरोप

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात अनेक पुरावे सापडूनही केंद्र सरकार अद्याप तिच्यावर बंदी घालत नाही, हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल, असाच विचार हिंदूंच्या मनात येत असणार !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी चौकशी कणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) दावा केला आहे, ‘केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील नारथ येथे आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी या संघटनेने पैसे जमा केले होते.’

आर्थिक गैरव्हाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला पीएफ्आयचा नेता रौफ शरीफ याच्या जामीनअर्जाला विरोध करतांना ‘ईडी’ने ही माहिती दिली.

 (सौजन्य : Kaumudy English)

या प्रशिक्षण केंद्राद्वारे देशात घातपात घडवून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असेही या आरोपात म्हटले आहे.