२१ डिसेंबर २०२० या दिवशी झालेल्या ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने…
१. हिंदूंनो, मागून वार करणार्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणार्या शिवरायांचा इतिहास नेहमी लक्षात ठेवा !
‘काही दिवसांपूर्वी दुचाकीने प्रवास करणार्या दोन हिंदुत्वनिष्ठांवर धर्मांधांनी मागून तलवारीने आक्रमण केले. ही घटना वाचून माझ्या मनात एक विचार आला, ‘त्या धर्मांधांनी त्यांचाच पूर्वज असलेल्या अफझलखानाकडून बोध घेतला असावा; पण बिचारे ते दोन हिंदुत्वनिष्ठ, जे स्वत:चे रक्षणही करू शकले नाहीत.’ हे धर्मांध अफझलखानी प्रवृत्तीनुसार मागून वार करण्यास अजूनही विसरलेले नाहीत. मग आपल्या थोर पूर्वजांनी, म्हणजेच छत्रपती शिवरायांनी त्यांच्यावर मागून वार करणार्या अफझलखानाविषयीचा इतिहास हिंदूच का विसरतात ?’
२. संपूर्ण जीवनात अनेक वेळा शिवराय मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आले, मग शिवरायांकडे नक्की कोणते चिलखत होते ?
जो अफझलखान दोन्ही हातांनी जाड लोखंडी पहार सहज वाकवू शकत होता, त्याची कट्यार शिवरायांच्या चिलखताला कशी भेदू शकली नाही ? शिवरायांचे जीवनचरित्र वाचल्यावर अफझलखान वधाचा प्रसंग काय, तसेच औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटण्याचा प्रसंग असो, तसेच शिवरायांनी केलेल्या पाच पातशाह्यांंचा केलेला संहार असो. असे कित्येक प्रसंग महाराजांवर ओढवले; परंतु प्रत्येक वेळी ते मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आले, ते त्यांच्याकडे असलेल्या चिलखतामुळेच ! मग हे चिलखत कशाचे होते ? पुढील घटना वाचल्यावर शिवरायांचे रक्षण करणार्या त्या चिलखताचे वैशिष्ट्य लक्षात येईल.
३. श्री विठ्ठल मंदिरात कीर्तनाला आलेल्या शिवरायांना मोगलांच्या सैनिकांनी वेढा घातल्याचे कळताच संत तुकाराम महाराजांनी आयुष्यात पहिल्यांदाच आणि तेही शिवरायांच्या रक्षणासाठी विठ्ठलाच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करणे
एकदा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी श्री विठ्ठल मंदिरात आले. तेव्हा त्याविषयी मोगलांना सुगावा लागला. लगेच त्यांनी संपूर्ण मंदिरालाच वेढा घातला. कीर्तन चालू असतांना याविषयी संत तुकाराम महाराज यांना कळताच त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली, ‘शिवाजी महाराज मोगलांच्या वेढ्यातून सुखरूप निसटू देत.’ तेव्हा विठ्ठलाने मोगलांच्या सैनिकांना मंदिरातील प्रत्येक भाविकाच्या ठिकाणी शिवरायांचे प्रतीरूप दाखवले. त्यामुळे मोगल खर्या शिवरायांना ओळखू शकले नाहीत. अशा प्रकारे शिवराय मोगलांच्या वेढ्यातून सुखरूप निसटू शकले.
४. शिवरायांची श्री गुरु आणि संत यांच्यावर दृढ निष्ठा असल्यामुळेच त्यांच्याभोवती गुरुकृपेचे चिलखत निरंतर कार्यरत असणे
आता आपल्या लक्षात आलेच असेल की, शिवरायांनी श्री रायरेश्वराच्या मंदिरात मूठभर मावळ्यांच्या समवेत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. त्या प्रसंगापासून शेवटपर्यंत शिवरायांची त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर अढळ निष्ठा होती. त्या निष्ठेमुळेच त्यांच्याभोवती चिलखत सतत कार्यरत होते. ते चिलखत कोणत्याही धातूचे नव्हे, तर ते गुरुकृपेचे चिलखत होते. आपण सर्व जण आपली श्री गुरूंवरील श्रद्धा आणि निष्ठा दृढ करूया, जेणेकरून सूक्ष्मातील सूक्ष्मच नव्हे, तर आपत्काळात हिंदुद्वेष्ट्यांकडून होणार्या स्थुलातील संभाव्य आक्रमणांपासूनही आपले रक्षण होईल !
५. प्रार्थना
हे गुरुमाऊली, छत्रपती शिवरायांची ज्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर दृढ श्रद्धा होती, त्याप्रमाणे आमचीही तुझ्यासह सर्व संतांच्या चरणी दृढ श्रद्धा निर्माण होऊ दे. तसेच ‘आम्ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वस्व अर्पण करून प्रयत्न करावेत’, ही तुझीच इच्छा आहे आणि ‘त्यासाठी तूच आमच्याकडून प्रयत्न करवून घेत आहेस’, असा भाव आमच्यामध्ये निरंतर जागृत राहू दे’, अशी श्रीचरणी प्रार्थना आहे.’
– श्री. चैतन्य दीक्षित, सनातन पुरोहित पाठशाळा, रामनाथी, फोंडा, गोवा. (१९.२.२०१८)