आली वर्ष २०२१ च्या ‘सनातन पंचांगा’ची सुवार्ता ।
सर्व साधक-साधिकांचे मन आनंदी झाले आता ।
घालूनी दारी रांगोळ्या सज्ज होती स्वागत करण्या ॥ १ ॥
हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग ।
करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥ २ ॥
अष्टांग साधनेचे (टीप) महत्त्व जाणून पंचांग सेवेस सिद्ध होऊया ।
अन् सुयोग्य नियोजनाद्वारे परिपूर्ण सेवा करूया ।
गुरुचरणांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून गुरुकृपेस पात्र होऊया ॥ ३ ॥
‘पंचांग म्हणजे गुरुधन’ ऐसा भाव मनी जागवूया ।
वेळेत हिशोब पूर्ण करून गुरुधनाची हानी टाळूया ॥ ४ ॥
‘कोरोना महामारी’मध्ये शासनाचे नियम तंतोतंत पाळूया ।
सेवेतील चुका टाळून सद्गुणांची जोपासना करूया ॥ ५ ॥
हे पंचांगदेवते, करूनी तव चरणी साष्टांग नमन ।
माझ्या मनोगतास देतो कृतज्ञताभावे गुरुचरणी पूर्णविराम ॥ ६ ॥
टीप – अष्टांग साधनेतील कृती : १. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, २. अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ७. सत्साठी त्याग आणि ८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)
– गुरुचरणसेवक,
श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर. (२०.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |