भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ यांविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना मिळालेले ज्ञान !

सध्या भारतात पाश्‍चात्त्य नृत्य आणि त्यांचे अन्य प्रकार शिकण्याचे फॅड वाढले आहे. असे असले, तरी देशातील अनेक युवतींचा ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ भारतीय शास्त्रीय पारंपरिक नृत्यही शिकण्याकडे ओढा वाढला आहे. या लेखात ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ ही नृत्ये शिकणार्‍या व्यक्तीवर होणारे मानसिक अन् आध्यात्मिक परिणाम, तसेच पाश्‍चात्त्य नृत्य आणि वरील दोन्ही भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार यांविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.

१. ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’

२. पाश्‍चात्त्य नृत्य, तसेच भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ यांविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना मिळालेले ज्ञान !

टीप १ – कथ्थक आणि भरतनाट्यम् या दोन्ही नृत्यांचा निर्माता भगवान शिव आहे ! : ‘भारतीय परंपरेने नृत्यकलेची आद्यदेवता म्हणून नटराज शिवशंकराची सदैव आराधना केली आहे आणि या विश्‍वाचे अन् सृष्टीचे चलनवलन हे शिवाच्या नृत्याचे प्रतीक मानले आहे.’ (संदर्भ : भरतमुनीरचित नाट्यशास्त्र, आचार्य नंदिकेश्‍वररचित अभिनय दर्पण, भरतार्णव, ‘नृत्यसौरभ’ पृ. ५, मराठी विश्‍वकोश)

टीप २ – सर्वसामान्य व्यक्तीचा अहं २० टक्के असणे; पण कलाकारांचा अहं मात्र ४० टक्के असणे, यामागील कारण : ‘सर्वसामान्य व्यक्तीचा अहं अधिकाधिक ३० टक्के असतो; पण कलाकारांचा अहं अधिकाधिक ४० टक्केही असू शकतो. याचे कारण एखाद्या कलाकाराची कला चांगली असली, तरी त्याची मनोवृत्ती खराब किंवा विकृत असू शकते, उदा. चित्रकार म.फि. हुसेन. कलाकारांमध्ये त्यांच्यातील कलेमुळे ‘मला अधिक कळते’, ‘मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे’, असा अहंचा भाग आढळतो. त्यामुळे समाजातील कलाकारांचा अहं (पोलीस, राजकारणी यांच्याप्रमाणे) अधिकाधिक ४० टक्क्यांपर्यंत असू शकतो.’ – कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

सौ. योया वाले

३. नृत्य करतांना व्यक्तीच्या मनाची होणारी विचारप्रक्रिया

३ अ. पाश्‍चिमात्य नृत्य : सर्वसामान्य व्यक्तीमध्ये ‘मी चांगले नृत्य करते’, असा अहं असतो, तसेच ‘प्रेक्षकांनी माझ्याकडे पहायला हवे’, अशी अपेक्षाही असते.

३ आ. भरतनाट्यम् आणि कथ्थक नृत्य

३ आ १. सर्वसामान्य व्यक्ती : ‘मी चांगले नृत्य करते’, असा अहं आणि ‘प्रेक्षकांनी माझ्याकडे पहायला हवे’, अशी अपेक्षा असते; पण व्यक्तीने सात्त्विक नृत्याची निवड केली असल्याने तिच्या मनात काही प्रमाणात सात्त्विक विचारही असतात.

३ आ २. साधना करणारी व्यक्ती : ‘मी चांगले नृत्य करते’, अशा प्रकारचे कोणतेही विचार या व्यक्तीच्या मनात न येता केवळ ईश्‍वराचेच विचार येतात.’

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (४.४.२०२०)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.