लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘लेडी डॉन’ नावाने बनवलेल्या ट्विटर खात्यावरून, ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावह भाजपच्या नेत्यांच्या सर्व वाहनांमध्ये आर्.डी.एक्स.चा वापर करून बाँबस्फोट घडवला जाईल. यात सर्वांचा जीव जाईल’, अशी धमकी देण्यात आली आहे. याविषयी मेरठ पोलिसांनी ट्विटरला पत्र लिहून ‘लेडी डॉन’ खात्याची माहिती मागितली आहे. उत्तरप्रदेश विधानसभा, लक्ष्मणपुरी रेल्वे स्टेशन आणि गोरखपूर मठ हेही बाँबद्वारे उडवून देण्याची धमकीही या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर ट्विटरने हे खाते काही काळासाठी बंद केले आहे.