महाराष्ट्र शासनाकडून ‘मूर्तीविसर्जनामुळे जलप्रदूषण होते का ?’ याच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना !

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते का ?, याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. येत्या ३ मासांत ही समिती याविषयीचा अहवाल शासनाला सादर करेल.

रस्त्याअभावी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणार नाही !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही गावातील रस्त्यांची दुर्दशा असणे प्रशासनाला लज्जास्पद !

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दंगल प्रकरणातून ३८ जणांची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता !

या प्रकरणात १७ वर्षांनंतर निकाल लागला असून सत्र न्यायाधीश एस्.एस्. गोसावी यांनी हा आदेश दिला. दंगल आणि पोलीस अधिकार्‍यांवर दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ३८ जणांवर ठेवण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड येथील दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे खाणीत विसर्जन करून महापालिकेकडून जनतेची दिशाभूल ! – प्रदीप नाईक, माहिती अधिकार कार्यकर्ते

२९ सहस्र ९८ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले, तर एकही मूर्ती दान झाली नसल्याची माहिती महापालिकेने नाईक यांना दिली आहे.

सांगली येथील विसावा मंडळाच्या वतीने ५ सहस्रांहून अधिक श्री गणेशमूर्तींचे कृष्णा नदीत विसर्जन !

सरकारी घाट, माई घाट आणि विष्णु घाट अशा तिन्ही घाटांवर ही मोहीम राबवण्यात आली.

रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !

मूर्ती विसर्जन करण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने पुणेकरांनी नाईलाजाने १ लाख ६ सहस्र मूर्ती दान केल्या !

देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे. धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान हे अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ?

गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी राज्यात २० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू !

गणेशोत्सव विसर्जनाला गालबोट लागले असून राज्यातील २० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मुंबई येथे ३, पुणे २, नगर ३, अमरावती १, मालेगाव येथे १, खानदेश ६, तर सोलापूर येथे ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मुंबईसह नवी मुंबईमध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोताला प्राधान्य !

२० सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३४ सहस्र ४५२ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांना श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रात देणे, तसेच फिरत्या हौदात विसर्जन करणे भाग पडले !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या नियोजनाचा पुणे महापालिकेचा बोजवारा !