१. ‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात.
२. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.
(सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे, यु ट्यूब)
३. हे खोकला, घशाला सूज येऊन घसा दुखणे, कान, सांधे आणि मणके यांमधील सूज अल्प करते.
४. या वनस्पतीला पिवळ्या रंगाची फळे येतात. ज्यांचे दात किडून दुखतात, त्यांच्यासाठी याचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा. या फळांचे चूर्ण करून त्याचे डालडा तूपामध्ये मिश्रण करावे आणि ते मिश्रण एका गरम काविलथ्यावर (धातूच्या उलथण्यावर) टाकावे. त्यातून येणारा औषधी धूर तोंडामध्ये घेतल्यावर दातामधून अक्षरशः कीड पडते’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१.३.२०२३)
संपर्कासाठी ई-मेल : [email protected]