‘सर्दीमुळे किंवा थंड वारा लागल्याने रुग्णाच्या कानांत दडे बसून ते दुखू लागल्यास, लालबुंद निखार्यांवर हळद घालून त्यातून येणारा गरम धूर कानांत जाईल, अशी व्यवस्था करावी. असे केल्याने गरम औषधी धूर रुग्णाच्या कानांच्या आतपर्यंत जाऊन त्याचे कान शेकले जातात. यामुळे दडे बसलेले जड कान अकस्मात् मोकळे होऊन हलके होतात आणि कानदुखी थांबते. हा साधा-सोपा उपाय अवश्य करून त्याचा लाभ अनुभवा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१६.३.२०२३)
संपर्कासाठी ई-मेल : [email protected]