मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर केवळ २ पर्याय उरले !

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५३, काँग्रेस ४४ आणि शिवसेनेकडे १६, असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी सरकारकडे असलेले हे संख्याबळ पहाता सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले जात आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री अनुकूल !

२८ जून या दिवशी समितीतील एका गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर त्यांनी दि.बा. पाटील यांच्या नावाला हरकत नसल्याचे म्हटले, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मला काळजी वाटते, तुम्ही परत या ! अजूनही वेळ गेलेली नाही !  

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ जून या दिवशी पुन्हा एकदा पक्षाच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली आहे.

अंतिमत: विजय उद्धव ठाकरे यांचाच होईल ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मला विश्वास आहे की, त्यांचे आसामला गेलेले काही आमदार जेव्हा परत येतील, तेव्हा त्यांच्यासमवेत बैठक होईल आणि त्यात उद्धव ठाकरे हे सरकार चालवू शकतात, हे स्पष्ट होईल असा विश्वास पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आषाढी वारीमध्ये वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्या ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना संसर्ग, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापन यांविषयी आढावा बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात शिवसैनिकांचा मोर्चा !

‘शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है’, यांसह अन्य घोषणा देत शिवसैनिकांनी २४ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला.

शिवसेना म्हणजे निखारा असून त्यावर पाय ठेवला, तर जाळून टाकू ! – मुख्यमंत्री

‘बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे अधिक प्रेम आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी उपस्थितांनी ‘गद्दारांना परत घेऊ नका’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांना परत घेणारच नाही.’’

शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न वापरता जगून दाखवा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आव्हान

विद्यार्थी आणि तरुण यांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय !

कोरोना महामारीच्या काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे नोंद केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रीय समित्यांना कार्यवाही करण्यासाठी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याची पोहरादेवीच्या महंतांची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.