
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे गटांत विभागला गेल्यामुळे यावर्षी विधीमंडळाच्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यालय कुणाकडे जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही व्यवस्था करतांना शिवसेनेचे मूळ कार्यालय हे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला देण्यात आले असून ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षासाठी दुसर्या कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आम्हाला हुसकावून लावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयाचा प्रश्न विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित होऊन त्यावरून वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
(सौजन्य : Zee 24 Taas)
सध्या ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यांविषयीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून ‘आपण मूळ शिवसेना’ असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान