मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ७ जुलै या दिवशी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी ‘उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे’, असे फलक मुंबईत लावण्यात आले होते. मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेणे यातून वेगवेगळे राजकीय तर्क काढले जात आहेत. या भेटीविषयी अद्याप एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे यांच्याकडून अधिकृतपणे वाच्यता करण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास शिवसेनेला अडचण येऊ शकते, अशी चर्चा आहे.
🕗| मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट#Mumbai #MNSPresident #RajThackeray #visited #ChiefMinister #EknathShinde #Varsharesidence #MNS pic.twitter.com/Ii2jsh2Qxu
— RNO | Right News Online मराठी (@RNO_OfficialM) July 7, 2023