ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश !

पुणे – विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

या वेळी नीलम गोर्‍हे यांना उद्धव ठाकरे गटात सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्याच्या संदर्भात प्रश्‍न विचारला. त्यावर ‘सटरफटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातील प्रश्‍न यासाठी शिंदे यांच्यासमवेत काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे’, असे त्या या वेळी म्हणाल्या.