श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन ! – हिंदु जनजागृती समिती

नागरिकांना कायद्याचा धाक दाखवणारे प्रशासन मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी गप्प का ? – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

समीर गायकवाड यांच्या अटकेची माहिती देणारे पोलीस अधिकारी संजय कुमार हे श्री तुळजाभवानी मंदिर घोटाळ्याप्रकरणी गप्प का राहिले ? – सनातन संस्था

कोट्यवधी हिंदू भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याविषयीचा चौकशी अहवाल अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी २० सप्टेंबर २०१७ या दिवशी गृह विभागाला सादर केला

श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान धार्मिक विधी बंद करून व्यावसायिकपणा करत आहे ! – भोपे पुजारी मंडळाचा आरोप 

तत्कालीन निजाम सरकारने वर्ष १९०९ मध्ये मंदिर प्रशासनासाठी बनवण्यात आलेल्या देऊळ कवायत नियमावलीचा आता सोयीस्कररित्या चुकीचा अर्थ काढून मंदिर संस्थान शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा, देवी भक्तांचे कुलधर्म कुलाचार बंद करत आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या अभिषेक पूजेस २ वर्षांनंतर प्रारंभ !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पूजा चालू करण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला. कोरोनाच्या निर्बंधामुळे २ वर्षांपासून ही पूजा बंद होती.

श्री तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थ कुंडाच्या बाजूचे स्वछतागृह हटवा ! – हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

एका शक्तीपिठाच्या ठिकाणी पवित्र गोमुख तीर्थाच्या कुंडाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधून मंदिर समिती त्याचे पावित्र्य भंग केले आहे. त्यामुळे मंदिर समितीने हे स्वच्छतागृह तेथून तात्काळ हटवणे आवश्यक आहे !

मंकावती तीर्थकुंड हडप केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात देवानंद रोचकरी बंधूंना जामीन संमत !

तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध केल्याच्या प्रकरणी आरोपी रोचकरी बंधूंना संभाजीनगर उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर या दिवशी जामीन संमत केला आहे.

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांकडे सरकार ५ वर्षे फिरकलेच नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?

श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भाविकांची लूट !

श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भक्तांना गंडा घातला जात असल्याची माहिती समोर आली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या भक्तांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी !

५ दिवसांची मंचकी निद्रा संपल्याने देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना !

‘आई राजा उदो उदो’चा गजर : संबळाच्या कडकडाटात आणि कुंकवाच्या मुक्त उधळणीत श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन !

पुजारी-भाविक यांसह मानकर्‍यांमध्ये अभूतपूर्व उत्साह, मातेची श्रमनिद्रा चालू !