ठाणे येथे प्रवाशांना लुटणारी धर्मांधांची टोळी अटकेत

कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्शाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना लुटणारे मोहम्मद हयात सय्यद (वय ३० वर्षे), मुस्तफा पावसकर (वय ३७ वर्षे) आणि मुज्जमील उपाख्य गुड्डू उपाख्य हॉरर शेख (वय २४ वर्षे) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली आहे.

वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात पश्‍चिम महाराष्ट्रात महावितरणची धडक कारवाई

वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा उपयोग करणार्‍या वीज चोरांविरोधात महावितरणने धडक कारवाई चालू केली आहे, अशी माहिती प्रादेशिक संचालक प्र. नाळे यांनी दिली. 

लातूर जिल्ह्यात बसस्थानकातून चोरट्यांनी एस्.टी. बस पळवली

बसस्थानकात ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुक्कामी असलेली बस चोराने पळवली. बसचे वाहक आणि चालक बसस्थानकात झोपले होते. बस चोरीला गेल्याचे लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

सातारा येथे पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून युवकाचे आंदोलन

शेतातील पिकाची चोरी होत असल्याविषयी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने भुरकवडी (जिल्हा सातारा) येथील युवकाने पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून आंदोलन केले.

भोजनातून गुंगीचे औषध देऊन ९ कलाकारांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी

हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रात १ सहस्र ८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस

वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये चोरट्यांनी २ दिवसांत २ ठिकाणी एटीएम् यंत्र चोरून नेले !  

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्यामुळे तेथे चोरट्यांचे फावणारच !

चालत्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी पळवले ५० सहस्र रुपये

शेती कापसाच्या विक्रीतून आलेले ५० सहस्र रुपये बँकेतून काढून नेतांना चोरट्यांनी चालत्या गाडीच्या डिक्कीतून ते पळवले. ही घटना चौकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आणि त्यावरून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

भुरट्या चोरांना मार्गावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांची आरोपी दत्तक योजना !

गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांना अशा योजना राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आरोपींना देण्यात येणारी रक्कम पोलिसांच्या खिशातून द्यायला हवी ! इथेही पोलिसांनी भ्रष्टाचार केला तर . . . !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चांदीच्या पादुका आणि चंदनाच्या झाडांची चोरी

मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !