पाणी पिण्याच्या उद्देशाने मंदिरात घुसून मूर्तीची माहिती मिळवल्याचे उघड !
|
जयपूर (राजस्थान) – येथील दिगंबर जैन मंदिर आणि शिवमंदिर येथे चोरी करणार्या शहजादा सलीम याला पोलिसांनी अटक केली. त्याने या मंदिरांमधील अष्टधातूंच्या ७ मूर्ती, ३ किलोग्राम चांदीची भांडी आणि अन्य मौल्यवान वस्तू यांची चोरी केली होती. त्यांतील ५ मूर्ती त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. उर्वरित मूर्ती आणि वस्तू त्याने राहुल सिंधी या भंगारवाल्याला विकल्यावरून पोलिसांनी सिंधी यालाही अटक केली आहे. (चोरीच्या मूर्ती विकत घेऊन धर्मांध चोरांना साहाय्य करणार्या अशा हिंदुद्रोह्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक) शहजादा सलीम सराईत चोर आहे. ‘तो कचरा गोळा करण्याच्या नावाखाली चोरी करण्यासाठी घरांचे अवलोकन करत होतो आणि संधी मिळाल्यावर तेथे चोरी करतो’, असे पोलिसांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुमित गुप्ता यांनी सांगितले की, ७ ऑगस्टच्या दिवशी सलीम मंदिरामध्ये पाणी पिण्याच्या उद्देशाने घुसला होता. त्याने तेथे मूर्ती पाहिल्यानंतर त्या चोरण्याचा कट रचला.
Jaipur: Ragpicker Shehzada Salim steals antique Murtis and jewellery from Jain and Shiv temple, had entered temple to ‘drink water’ https://t.co/MYbRQ5Riop
— OpIndia.com (@OpIndia_com) August 10, 2021