कोल्हापूर येथे श्री गणेशमूर्तीच्या अंगावरील दीड किलो चांदीचे दागिने चोरणार्‍या चोरास अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर, २२ सप्टेंबर – ऐन गणेशोत्सवाच्या काळात १५ सप्टेंबर या दिवशी राजाराम चौक येथील छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळाच्या श्री गणेशमूर्तीच्या अंगावरील दीड किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दागिने चोरणारा अरुण महेश हुक्केरी याला अटक केली असून त्याच्याकडून ६४ सहस्र ९०७ रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी मंडळाच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीविषयी तक्रार नोंदवण्यात आली होती. (संबंधित दोषींना कठोर शिक्षा दिल्यास पुन्हा चोरी करण्याचे त्यांचे धैर्य होणार नाही ! – संपादक)