भिवंडी येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळणार्‍या धर्मांधाला नागरिकांनी चोपले !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारीतील धर्मांधांचे प्रमाण वाढत असून भिवंडी शहर दिवसेंदिवस अधिकच असुरक्षित होत आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलून याला आळा घालावा ! – संपादक

ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी येथील कोंबडपाडा भागात एक चोर रस्त्यावरून जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन दुचाकीवरून पळून जात होता. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून चोपले. (चोराला पकडण्यासाठी प्रयत्न करणार्‍या नागरिकांचे अभिनंदन ! नागरिक पाठलाग करू शकतात, तर पोलिसांना ते का जमत नाही ? – संपादक) याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोरटा सलमान पठाण (वय ३० वर्षे) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.