महापालिकेच्या आरोग्य विभागातील तरुणाकडून चोरीचे २१ भ्रमणभाष जप्त

समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !

पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणार्‍या तरुणाने कर्ज फेडण्यासाठी भ्रमणभाष चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने ५० हून अधिक भ्रमणभाषची चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला कह्यात घेत त्याच्याकडून १ लाख ८८ सहस्र रुपयांचे २१ भ्रमणभाष जप्त केले आहेत. तानाजी रणदिवे असे कह्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.