कोरोना नियमांचे पालन करून चारधाम यात्रा प्रारंभ करा ! – उत्तराखंड उच्च न्यायालयाचा आदेश

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड उच्च न्यायालयाने कोरोना नियमावलीचे पालन करून चारधाम यात्रा चालू करण्याचा आदेश दिला आहे. जून मासामध्ये या यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.

१. न्यायालयाने आदेशात म्हटले की, बद्रीनाथ धाममध्ये प्रतिदिन १ सहस्र २००, केदारनाथ धाममध्ये ८००, गंगोत्रीमध्ये ६०० आणि यमुनोत्रीमध्ये ४०० यात्रेकरूंना जाण्याची अनुमती असेल. तसेच यात्रेकरू कोणत्याही तलावात स्नान करू शकणार नाहीत. प्रत्येक भाविकाने कोरोना झाला नसल्याचा अहवाल आणि लसींचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र स्वत:समवेत ठेवावे.

२. सरकारच्या वतीने महाधिवक्ता म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत चारधाम यात्रेच्या बंदीचा निर्णय मागे घेतला पाहिजे. सरकार यात्रेकरूंसाठी नवीन नियम जारी करील.