पाकिस्तानच्या आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास चीनचा पुन्हा विरोध !

चीनच्या अशा कारवायांना जगातील सर्व देशांनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक !

अजमेर दर्ग्याच्या पदाधिकार्‍याच्या मुलाला खलिस्तानी आतंकवाद्याला साहाय्य केल्याच्या प्रकरणी अटक

राजस्थान येथे कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणातही अजमेर दर्ग्याच्या एका सेवकाला अटक करण्यात आली होती. एकूणच या दर्ग्याचा कुणाकुणाशी संबंध आहे, हे लक्षात घेता तेथील सर्वांची कसून चौकशी करायला हवी !

जिहादी आतंकवादाच्या विरोधात रणनीती सिद्ध करणारी संयुक्त राष्ट्रांची बैठक भारतात होणार !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘आतंकवाद प्रतिबंधक समिती’ची महत्त्वाची बैठक २८ आणि २९ ऑक्टोबर या दिवशी भारतात होत आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत, तर २९ ऑक्टोबरला देहलीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोईंबतूर येथील मंदिराजवळील स्फोटामागे आतंकवाद्यांचा हात असल्यावरून चौकशी

स्फोटात ठार झालेला जमेझा मुबीन याचा इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून गेल्या वर्षी झाली होती चौकशी !

पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी !

दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी  

जिहादचा पोशिंदा पाक ‘एफ्.ए.टी.एफ्’च्या करड्या सूचीतून बाहेर !

जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असणार्‍या पाकिस्तानला ४ वर्षांनी ‘एफ्.ए.टी.एफ्’ने त्याच्या करड्या सूचीतून बाहेर काढले आहे. पाकिस्तानने या निर्णयावर आनंद प्रदर्शित केला असून आतंकवादाच्या विरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे.

पाकिस्तानच्या ‘एफ्-१६’ लढाऊ विमानांच्या नूतनीकरणाच्या व्यवहाराला अमेरिकेच्या एकाही खासदाराचा विरोध नाही !

अमेरिका हा विश्‍वास ठेवण्यासारखा देश नाही, हे जगाला पुन्हा एकदा लक्षात आले आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेशी तसाच व्यवहार करणे आवश्यक आहे !

वाराणसी येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

बासित महत्त्वाची स्थाने, तसेच नागरिक यांना लक्ष्य करण्यासाठी स्फोटके जमा करत होता. त्याच्याकडून बाँब बनवण्याच्या संदर्भातील कागदपत्रे, भ्रमणभाष, भ्रमण संगणक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ५ राज्यांतील ४० ठिकाणी धाडी

आतंकवादी, तस्कर आणि गुंड यांचा शोध !

शोपिया (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून ग्रेनेड फेकून २ हिंदु कामगारांची हत्या

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद चालू होऊन ३३ वर्षे उलटल्यानंतरही तेथे हिंदू अद्यापही असुरक्षितच आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !