S Jaishankar : भारत आता एक गालावर चापट खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करणारा राहिलेला नाही !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्पष्टोक्ती !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – भारत आता एका गालावर चापट खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करण्याच्या मानसिकतेमध्ये राहिलेला नाही, तर जशास तसे उत्तर देण्यासाठी तो सिद्ध झाला आहे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी एका कार्यक्रमात केले.

डॉ. एस्. जयशंकर म्हणाले की, मला वाटते आज देशामध्ये पालट होत आहे. विशेष करून मुंबईतील २६/११ च्या आक्रमणानंतर त्याच्या मानसिकतेत पालट झाला आहे. काही जण म्हणतात, ‘एका गालावर चापट खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करणे, ही एक चांगली रणनीती आहे.’ मला नाही वाटत की, देश आता अशा प्रकारचा विचार करतो. जर भारताच्या सीमेमध्ये कुणी आतंकवादी कारवाया करत असेल, तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे, त्यासाठी पैसे खर्च करावेच लागणार आहेत.

संपादकीय भूमिका

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी अशा प्रकारचा पालट होणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! भारताने आधीपासूनच असे धोरण ठेवले असते, तर भारत आज महासत्ता झाला असता !