‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच. मोठ्या प्रमाणात निधी येणारी मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत आणि हे पैसे इतर कामांसाठी वापरले जात आहेत. माहिती अधिकाराद्वारे प्राप्त माहितीतून सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार, भूमीचे अपव्यवहार, दागिन्यांची चोरी आदी अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत. आपल्या मंदिरांविषयी कुणीही चुकीचे वक्तव्य करण्यास धजावणार नाही आणि वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य करणार नाही, असे प्रभावी संघटन झाले पाहिजे.