ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो ! – पुजाऱ्यांचा दावा

नाशिक – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाला आहे, असे पुजाऱ्यांनी सांगितले. सध्या आसाममध्ये महापूर आला आहे. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो, असा दावा पुजाऱ्यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी आदी स्थळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. येथे अनेक भाविक पूजाविधीसाठी येतात. या मंदिरात मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सीसीटीव्ही’चे चित्रण पडताळून त्या पिडींवर खरेच बर्फाचा गोळा सिद्ध झाला आहे ? कि या पाठीमागे दुसरे काही कारण आहे ?, हे शासकीय अधिकारी पडताळत आहेत. ‘सीसीटीव्ही’चे चित्रण समोर आल्यानंतरही याविषयीची माहिती समजू शकणार आहे.
वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळीही शिवपिंडीवर जमा झाला होता बर्फ !
यापूर्वी वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी असा बर्फ शिवपिंडीवर जमा झाल्याचे सांगण्यात आले.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
श्रीक्षेत्र जेजुरी येथील ‘श्री खंडोबा डोंगरा’वर मद्यपींचा धिंगाणा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी