‘गूगल मॅप’वर मंदिराच्या ठिकाणी मशीद दाखवणारे तिघे मुसलमान पोलिसांच्या कह्यात !

रतलाम (मध्यप्रदेश) – ‘गूगल मॅप’वर (मानचित्र (नकाशा) पहाण्याचे संकेतस्थळ) येथील भदवासा गावातील श्री अंबेमातेच्या मंदिराच्या ठिकाणी कहकशां मशीद दाखवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. गावकर्‍यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम ‘२९५ अ’ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून शाहरुख, आमीन आणि अन्य एका अल्पवयीन मुलाला कह्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे तिघेही गावात रहाणारे आहेत. यांतील शाहरुख याने हा पालट करून त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले होते. याविषयी गावकर्‍यांनी शाहरुखकडे विचारणा केली. त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी शाहरुख याला कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे आक्रमण करण्याचे आता कट्टरतावादी मुसलमानांना शिल्लक ठेवलेले नाही, हेच या घटनेतून लक्षात येते !