मंदिरात मांस खाण्यावरून आणि मद्य पिण्यावरून पुजार्‍याची हत्या

प्रतीकात्मक छायाचित्र

पीलीभीत (उत्तरप्रदेश) – मंदिरात मांस खाणे आणि मद्य पिणे यांवरून पुजार्‍याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मारेकर्‍यांनी बाबा ऋषि गिरि उपाख्य मदनलाल पुजारी याला मांस न खाण्यास आणि मद्य न पिण्यास सांगितले होते. त्याने त्यांचे म्हणणे नाकारल्यामुळे लाठीकाठीने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह गावाबाहेरील नदीच्या किनारी फेकण्यात आला. येथील जिठानिया गावातील महादेव मंदिरात तो गेल्या ३ वर्षांपासून पुजारी म्हणून काम करत होता.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने कुणाला मंदिरात पुजारी ठेवावे, हेही ठाऊक नसल्याने आणि कायदा हातात घेऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा घटना घडतात !