बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून ४ हिंदु मंदिरे आणि मूर्ती यांची तोडफोड

बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

मुसलमानांनी ४ हिंदु मंदिरे आणि त्यांतील हिंदूंच्या देवतांची मूर्ती यांची केली तोडफोड !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील गायबंध जिल्ह्यातील गोबिंदगंज उपजिल्ह्यात मुसलमानांनी ४ हिंदु मंदिरे आणि त्यांतील हिंदूंच्या देवतांची मूर्ती यांची तोडफोड केली. (बांगलादेशमधील हिंदू, तसेच त्यांची मंदिरे यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारला सक्त ताकीद द्यावी, अशी भारतातील हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

या तोडफोड प्रकरणातील एक आरोपी अरिफुल इस्लाम याला स्थानिकांनी पकडून पोलिसांकडे सुपुर्द केले.