परीक्षेच्या ताणामुळे ११ वी इयत्तेत शिकणार्‍या फोंडा येथील विद्यार्थिनीची आत्महत्या

(प्रतिकात्मक चित्र)

फोंडा, ४ मे (वार्ता.) – परीक्षेचा ताण सहन न झाल्याने फर्मागुढी येथील उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

फोंडा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोंडबाग, बेतोडा येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीने नक्टेश्‍वर सभागृहाजवळ तिच्या काकांच्या घरात असतांना इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. फोंडा पोलिसांनी केलेल्या अन्वेषणानुसार विद्यार्थिनीला नैराश्य आले होते. या विद्यार्थिनीने ५ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा आत्महत्या रोखण्यासाठी समाजाला साधना शिकवणे आवश्यक !
  • मनुष्यजन्माचा उद्देशच समाजाला न कळल्यामुळे व्यावहारिक अपयशामुळे किंवा त्या भीतीने ताण येणे, अपयश आल्यास खचून जाणे, निराशा येणे या गोष्टींमुळे असे टोकाचे पाऊल उचलले जाते ! त्यामुळे केवळ व्यावहारिक शिक्षण देऊन व्यक्तिमत्व घडत नाही, तर त्याच्या जोडीला अभ्यासक्रमातून साधनाही शिकवणे आवश्यक आहे.