पाकिस्तानची महिला असल्याच्या संशयावरून महिलेला कळंगुट येथे घेतले कह्यात
गोवा पोलिसांनी पाकिस्तानची नागरिक असल्याच्या संशयावरून २७ वर्षीय एका महिलेला कळंगुट येथे कह्यात घेतले आहे. संबंधित महिला वास्तव्यास असलेल्या परिसरातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.