केंद्रीय शासकीय कार्यालयांसाठी म्हापसा परिसरात केंद्रीय सचिवालय उभारणार

पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – राज्यात कार्यरत असलेली केंद्रशासनाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी म्हापसा परिसरात केंद्रीय सचिवालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी अधीक्षक अभियंता आणि प्रधान संचालक यांना केंद्रीय सचिवालय उभारण्यासाठी म्हापसा परिसरात भूमी पहाण्यास सांगितले आहे. विविध केंद्रीय शासकीय कार्यालयांच्या एकूण २७ प्रमुखांसमवेत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही सूचना केली आहे.