Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

नवी देहली – धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर आता कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालय देण्यात आले आहे. जोशी हे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. आता त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.