स्वाध्याय परिवाराचे डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

डॉ. श्रीनिवास नीळकंठ तळवलकर

ठाणे – स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई डॉ. श्रीनिवास नीळकंठ तळवलकर यांचे १९ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. स्वाध्याय कार्यातील त्यांचे योगदान मोठे होते. श्रीनिवास तळवलकर यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे.

श्रीनिवास तळवलकर हे स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे यजमान होते. स्वाध्याय परिवाराचे काम सांभाळत असतांना त्यांनI मोलाची साथ लाभली होती.