जळगाव येथील शालार्थ आयडी घोटाळा
शालार्थ आयडी काय आहे ?शालार्थ आयडी हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागांद्वारे सरकारी अन् अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतनासाठी दिला जाणारा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे. हा क्रमांक मिळाल्याविना कर्मचार्यांना शासनाकडून नियमित वेतन मिळत नाही.या अंतर्गत झालेल्या घोटाळ्यात आयडींच्या आधारे काही व्यक्तींनी सरकारी वेतन लाटले. यात शासनाची पुष्कळ आर्थिक हानी झाली. |
नाशिक – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील १६० कोटी रुपयांच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळा विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) उघड केला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याने अधिकाराचा अपवापर करत २५९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोणत्याही कोणतीही सरकारी प्रक्रिया न राबवता बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नोकर्यांना संमती दिली, हे उघड झाले आहे. घोटाळ्यातील एकूण ८४१ बनावट आदेशांपैकी सर्वाधिक आदेश हिंगोणेकर याच्या कार्यकाळात देण्यात आले असून या प्रकरणी आता ‘संघटित गुन्हेगारी’चे (मकोकासदृश) कलम वाढवण्यात आले आहे.
१. २८ ऑगस्ट २०११ ते जून २०२५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील २५९ शिक्षक आणि कर्मचारी यांचे काढलेले शालार्थ आदेश बनावट असल्याचे सिद्ध झाले.
२. बनावट शालार्थ आयडी बनवून संबंधित कर्मचार्यांचे नियमित वेतन आणि थकबाकीची मोठी रक्कम हडप करण्यात आली.
३. जळगावमधील ३६८ कर्मचार्यांपैकी ११६ जणांची कागदपत्रे शालार्थ प्रणालीवर अपलोडच केली गेली नव्हती.
४. या भ्रष्टाचारात केवळ शिक्षणाधिकारीच नव्हे, तर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, दलाल आणि मोठे राजकीय नेते यांचाही सहभाग असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.

B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !