
पुणे – देशातील महापुरुषांना आपण विसरत चाललो आहोत. त्यांची केवळ जयंती साजरी करण्यापेक्षा, तसेच त्यांना जाती-पातींच्या राजकारणात न अडकवता त्यांचे योगदान आठवणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले. ‘लोकमान्य स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक जयंती सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे, नगरसेवक कुणाल टिळक, अश्विनी गानू, शुभम कुलकर्णी उपस्थित होते. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांना या कार्यक्रमात ‘लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता’ पुरस्काराने गौरवण्यात आले. इंग्रजांनी भारतीय कुटुंब व्यवस्था मोडणे आणि भारताविषयी हीन भावना निर्माण करणे यांसाठी त्यांची शिक्षणपद्धती भारतात रुजवली; मात्र टिळकांनी या विरोधात आवाज उठवला, असे देवधर यांनी सांगितले. या कार्यक्रमात –
१. कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्याख्यान आणि कीर्तन यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी १०० कीर्तन करण्याचा विचार व्यक्त केला.
२. संदीप खरे यांनी लोकमान्य टिळकांवरील कविता सादर केली. प्रत्येक क्षेत्रात निष्ठेने काम करणे, हीच राष्ट्रभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
३. कुणाल टिळक यांनी पुण्याची ओळख जागतिक स्तरावर नेण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे नमूद केले.
४. डॉ. सलील कुलकर्णी यांनी बालपणातील संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
५. इतरांच्या पाल्याला आपले पाल्य समजून सजग रहाणे आवश्यक असून ही काळाची गरज आहे, असे मत नसरापूर घटनेतील पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केले.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक