‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित

(‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्र म्हणजे शत्रूची क्षेपणास्त्रे किंवा विमाने हवेतच पाडण्यासाठी वापरले जाणारे संरक्षणात्मक क्षेपणास्त्र)

वॉशिंग्टन (अमेरिका) – मोठ्या प्रमाणावरील सैनिकी कारवाईमुळे अमेरिकेच्या ‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने संपू शकत असल्याच्या सैन्याच्या चेतावणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण करण्याचा निर्णय स्थगित केला. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, ‘आवश्यकसा भासल्यास आमच्यापुढे सर्व पर्याय उघडे आहेत.’ एप्रिल मासाच्या अंतापर्यंत अमेरिकेने १ सहस्र २०० हून अधिक ‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.

अमेरिकेने सध्या सैनिकी कारवाईऐवजी व्यावसायिक बाबक झंजानी यांच्या जाळ्याशी संबंधित ४ व्यक्ती आणि ९ आस्थापने यांच्यावर नवीन निर्बंध लादून इराणवर आर्थिक दबाव वाढवण्याचा मार्ग निवडला आहे.