Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली

आता २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा नेण्याला अनुमती

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील बालेन शहा सरकारने भारतीय चलनावर लादलेली बंदी उठवत २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा देशात आणण्यास अन् बाहेर नेण्यास अनुमती दिली आहे. ही अनुमती नोव्हेंबर २०१६ नंतर प्रसारित केलेल्या नोटांसाठी असेल; परंतु याची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती २५ सहस्र रुपये असेल. यामुळे नेपाळला जाणार्‍या भारतियांबरोबरच सीमावर्ती भागातील नेपाळी लोकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे, जे सामान खरेदी करण्यासाठी सीमा पार करतात.

भारताने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी केल्यानंतर नेपाळमध्ये केवळ १०० रुपयांच्या नोटाच आणण्यास आणि नेण्यास अनुमती होती. ९ नोव्हेंबर २०१६ पूर्वी प्रसारित केलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पूर्वीप्रमाणेच प्रतिबंधित रहाणार आहेत.