सैनिकी शक्ती वाढवण्यात प्रचंड पैसा ओतल्याने पाकची दुरवस्था ! – तज्ञांचे मत
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जगातील सर्व खंडांतील उपासमारीवर संयुक्त राष्ट्रांनी वर्ष २०२५ चा अहवाल प्रसारित केला आहे. अहवालानुसार गेल्या काही वर्षांत जगातील अनेक गरीब भागांत उपासमार अल्प होत चालली आहे. तथापि याच कालावधीत पाकमध्ये परिस्थिती अधिक बिघडली. ‘युरेशियन टाइम्स’ने दिलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील माहितीनुसार पाकमधील कुपोषित लोकांच्या संख्येत तब्बल ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक तज्ञांनी याचा संबंध सैन्यावर होणार्या अतिरिक्त खर्चाशी जोडला आहे. गरिबांच्या हक्काचा पैसा सैन्यावर खर्च करणे पाकच्या आर्थिक अडचणी वाढवत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
काय सांगतात अहवालातील आकडे ?
१. जगात उपासमारी घटत आहे. २० वर्षांपूर्वी, म्हणजे २००४-२००५ मध्ये जगातील १४ टक्के लोकसंख्या उपासमारीचा सामना करत होती. आता ही संख्या अल्प होऊन ७.८ टक्के राहिली आहे.
२. वर्ष २०२५ मध्ये सलग तिसर्या वर्षी जागतिक उपासमार अल्प झाली. गेल्या वर्षी जगातील ६४.५ कोटी लोक, म्हणजेच जागतिक लोकसंख्येचा ७.८ टक्के भाग उपासमारीचा सामना करत होता. ही संख्या वर्ष २०२४ मध्ये ८.१ टक्के, तर वर्ष २०२२ मध्ये ८.६ टक्के होती.
३. २५ वर्षांपूर्वीपर्यंत चीनमध्येही उपासमारीची समस्या होती. ती त्याने सोडवली असून भारतातही यावर गतीने काम चालू आहे.
पाकिस्तान सैनिकी शक्ती वाढवण्यासाठी ओततो एवढा पैसा !
पाकिस्तान कुपोषण आणि अन्नसुरक्षा यांच्या संदर्भात तळाच्या क्रमांकावर असला, तरी संरक्षण खर्चात तो आशियातील सर्वोच्च देशांमध्ये समाविष्ट आहे. संरक्षण खर्चानुसार वर्ष २०२५ मध्ये पाकिस्तान आशियात ८ व्या स्थानावर होता. वर्ष २०२६-२०२७ साठी त्याने १०.८ अब्ज डॉलरचा (१ लाख कोटी भारतीय रुपयांहून अधिक) संरक्षण अर्थसंकल्प घोषित केला. तो वर्ष २०२५ च्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी अधिक आहे.

Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !