देहलीमध्ये चारचाकी वाहनात पाठीमागील सीटवर बसलेल्यांनाही सीट बेल्ट बंधनकारक !

नियमभंग केल्यास १ सहस्र रुपये दंड होणार !

नवी देहली – पश्‍चिम देहलीमध्ये चारचाकी वाहनात पाठीमागच्या सीटवर बसलेल्यांनाही आता ‘सीट बेल्ट’ बांधणे बंधकारक करण्यात आले आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना एक सहस्र रुपयांचा दंड भरवा लागणार आहे. देहली पोलिसांनी याविषयीची नोटीस जारी केली आहे.