मिरज तालुका बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !

महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते

मिरज (जिल्हा सांगली), २० जानेवारी (वार्ता.) – मिरज तालुका बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १९ जानेवारी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी मार्केटमधील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते

या पुतळ्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुतळ्याचा परिसर अस्वच्छ होता. ही गोष्ट लक्षात येताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचा परिसर स्वच्छ केला. या वेळी सर्वश्री आकाश जाधव, धनंजय शिदें, गणेश तोडकर, महेश मुळे, संदीप नाईक, सौरभ मोहिते, सागर कुंभार, नीलेश पवार, पवन साळुंखे, रितेश पवार, अभिषेक पवार, अशितोष साळुंखे, रवी पवार, अरुण साळुंखे उपस्थित होते.