
ढाका (बांगलादेश) – अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्स’ अर्थात् सीआयएचे माजी वरिष्ठ अधिकारी जेराल्ड पी. हॅमिल्टन यांना अमेरिकन दूतावासाने ढाका येथील एका आलिशान हॉटेलमध्ये उतरवले आहे. त्यांचा हा गुप्त ढाका दौरा आणि अमेरिकी दूतावासाकडून मिळालेले साहाय्य यांमुळे या क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे. बांगलादेशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप अमेरिकेवर वारंवार होत असतो. त्यामुळेही हा दौरा अधिक लक्षवेधी ठरला आहे.
१. हॅमिल्टन यांनी ‘सीआयए’मध्ये ३५ वर्षे घालवली असून त्यांनी अनेक वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांवर काम केले आहे. हा विभाग ऐतिहासिकदृष्ट्या विदेशातील गोपनीय माहिती गोळा करणे, गुप्त मोहिमा राबववणे आणि विदेशी गुप्तचर यंत्रणांचे व्यवस्थापन करणे, या कामांसाठी उत्तरदायी मानला जातो.
२. बांगलादेशातून अनेक प्रसंगी ‘सीआयए’वर ढाका येथे हस्तक्षेप करत असल्याचे आरोप झाले आहेत. यामध्ये सर्वांत अग्रस्थानी बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेवर त्यांचे सरकार पाडण्याचा आणि सत्तापालटाचा कट रचल्याचा उघडपणे आरोप केला होता.
३. बांगलादेशाच्या सध्याच्या तारिक रहमान सरकारमध्ये खलीलुर रहमान यांना परराष्ट्रमंत्री बनवण्यामागे अनेक तज्ञांनी अमेरिकेचा दबाव हे कारण मानले होते.
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी दृष्टीने अर्थ लावून हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचणारे शेल्डन पॉलॉक !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण