सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते १९ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू

जिल्ह्यामध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे यांस मनाई आहे.

मालवण येथे अवैध मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मासेमारांचे बेमुदत साखळी उपोषण चालू

३५ हायस्पीड ट्रॉलर्स अवैधपणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करत होते

गोवा सायबर गुन्हे विभागाकडून खलाशांसाठीचे बनावट नोकरभरतीचे रॅकेट उघडकीस

‘ओवर्ट मॅरिटाईम्’ या आस्थापनाच्या नावाने उमेदवारांना बनावट नोकरभरती पत्रे वितरित केली जात आहेत, अशी तक्रार सायबर गुन्हे विभागाकडे आली.

पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मतदारांना विविध आमिषे; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे अनेक उमेदवारांची कोंडी

कार्यकर्ते प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे जाऊ न देणे, हे अनेक उमेदवारांसमोरील एक मोठे खर्चिक आव्हान आहे.

कायदा सचिव चोखाराम गर्ग यांनी दिले राज्य निवडणूक आयुक्त पदाचे त्यागपत्र

‘एका सरकारी अधिकार्‍याकडे राज्य निवडणूक आयुक्ताचा पदभार सोपवणे, ही लोकशाहीची थट्टा आहे’,

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे धर्मांध मटणविक्रेत्याच्या तक्रारीवरून गोरक्षक राजेश पाल यांसह अन्य गोरक्षकांवर मारहाण आणि खंडणी यांचे गुन्हे नोंद

मुद्दसर अब्दुल रज्जाक शेख यांच्या आरोपावरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून त्यामध्ये श्री. राजेश पाल आणि अन्य गोरक्षक यांवर खंडणी अन् चोरी यांचेही गुन्हे नोंदवले.

केवळ नोंदणी विभागाने घेतलेल्या आक्षेपामुळे इच्छापत्रावरील निकाल ३१ वर्षे रखडला

वर्षानुवर्षे रखडलेले खटले आणि त्यावर होणारा लाखो रुपयांचा व्यय सर्वसामान्यांसाठी असह्य आहे. हिंदु राष्ट्रात न्यायदान करणारे ऋषिमुनींप्रमाणे साधनेतील उन्नत असतील. त्यामुळे न्यायदान प्रक्रिया जलदगतीने होईल !

नागपूर येथे वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा दाखवणार्‍या एका पोलीस अधिकार्‍यासह ३ पोलीस कर्मचारी निलंबित !

घटनास्थळी विलंबाने गेल्याने घायाळ वृद्धाला तत्परतेने रुग्णालयात न नेणार्‍या कर्तव्यचुकार पोलीस कर्मचार्‍यांचे केवळ निलंबन न करता त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !

पुणे येथील उड्डाणपुलावरील हिंदी सुविचाराला मनसेने काळे फासले

हिंदीतून सुविचार लिहिण्याच्या सूचना देणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर याविषयी कारवाई करण्याचे आश्‍वासनही कक्ष अधिकार्‍यांनी दिले आहे.

पुण्यात पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसेसमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन

अनेक ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करत पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसेसमधून पुणेकर अगदी एकमेकांना चिटकून दाटीवाटीने उभे राहून प्रवास करतांनाचे चित्र दिसत आहे. अनेक बस तर अगदी प्रवाशांना दारात उभे रहाण्याची वेळ येईपर्यंत भरल्या जात आहेत.